धुंद निशिगंध अर्ध उमलला
वार्यात सुंगंध सुलगून दरवळला`
तीच उरात पुन्हा कळ उठली
पुन्हा नव्याने परिणीता नटली
रात पुनवेची हळुवार बहरली
दव बिंदुनी हर वेल ही भिजली
मदमस्त मंद रातराणी फुलली
आस पुन्हा दो नयनी सरली
एक शहारा हसून फुलला
खळी उमटली हळूच गाला
बघ ही कांती आसुसली तुजला
प्रीतिचा मोहर भरून सजला
आज नको ही सेज रिकामी
नको डोळ्यात विरहाचे पाणी
मंत्र मुग्धा ह्या वेळी सजणा
ओली पहाट लुटून ने ना....
…….श्वास तुझा रोमातुन भिनला
कंठ दो घडी नि:स्तब्ध झाला
तूच जिवलगा - की भास् हा माझा...
विरघळल़ी प्रेमिका……बाहुत घेना
चिम्ब भिजुनी हे रान हिरवळले
हर पातीला सूर गवसले
फुला फुलातून भवर बघ उड़ले
तन- मन माझे तुझ्यात हरवले
एकच वादा आता हवा रे..
पुन्हा नको ही सल जीवा रे..
व्याकुळ हळवी सांज नको रे
ओठावर माझ्या तोष नको रे....
पुन्हा उमलेल निशिगंध जेव्हा...
श्रृंगार असाच हा सजेल तेव्हा...
भेटशील तू मला पुन्हा रे कान्हा
शत जन्मिची मी तुझी राधिका...