Friday, 5 May 2017

Jara tu thamb na re

A soldier's wife laments...


एक वीरगति, काही अपूर्ण क्षण. ...
जरा तू थांब ना रे
मन अधीर अजून माझे 
फुलात चालताना
दव कोवळे मनाचे
मनाशी बोलताना
ओले अजून भासे 
आता कुठे बहरली
सायली मांडवात
कळी कळी बहरता
गंधात रात्र जागे 
स्वप्नांच्या अंगणात
उल्केने हळूच यावे
ओंजळीत जाता जाता
एक स्वप्नं सोडून जावे 
गाण्याच्या मैफलीत
मल्हार मधेच मिसळावा
सुरात तुझ्या नि माझ्या
तल्लीन होवून जावा 
पान्हा मुक्या ऊरीत
फुटण्यास वाट शोधे
पंखात पाखरांच्या
बळ थोडे अजून यावे 
जरा तू थांब ना रे
मन अधीर अजून माझे.....