Tuesday, 13 June 2017

Maitrin

सहज ओळख करून देताना म्हणालास ,
"ही माझी मैत्रीण" 
निनादला तो शब्द कानात -
पण त्याचा अर्थ समजावून सांगशील ? 

मैत्रीण  - ही ओळखच किती गोड आहे  
नुसत्या नावामध्ये सुद्धा एक अनामिकशी ओढ आहे         

न बोलताच कळण्याची ,अबोलशी जाण आहे   
हलकंसं हसली जरी - संवाद परिपुर्ण आहे !

मनातलं सारं उमगावं , तिच्या डोळ्यातच तो ठाव आहे 
स्वप्नामध्ये वसलेलं असं दोघांचंच एक गाव आहे 

साऱ्या नात्यांहून सोवळा - तिचा आगळाच एक मान आहे 
न मागता दिलेला निरागस अधिकार आहे 

ती नसली जरी भवती तरी सुंदरसा भास आहे 
मनामध्ये रुजलेली कृष्णेचीच आस आहे 

ओळखीच्या गर्दीत ती एकटीच उभी छान आहे 
मन मोकळं वागावं - मी तिच्या सवे लहान आहे !

अंग अंग भिजले तरी उरलेली तहान आहे 

पूर्णत्व नकोच,तिची त्याच्यातच खरी बात आहे..... 

No comments:

Post a Comment