किती छान असेल ना राधा असणं
रुक्मिणी आधी हक्क मिळणं
मीरेची भक्ती नाही, कॄष्णेची विरक्ती नाही
तरी तिच्या तुळेत कुणीच नाही...
किती छान असेल ना राधा असणं
फक्त प्रेम धुंदीत जगणं!
वाट बघण्याचा तोष नाही, असूयेचा दोष नाही
.....अढळपदाची स्पर्धाच नाही
किती छान असेल ना राधा असणं
घुंगर बांधून बेफ़ाम नाचणं
पावरीचा शोध नाही, सुरांत कधी प्रदोष नाही
....रासलीलेला अंतच नाही
खरच छान असेल का राधा असणं ?
जपात नाव पहिले उठणं?
इतकं सुंदर, इतकं पूर्ण....
सर्वांपासून वेगळच जगणं
कुणास ठाऊक, कसं ओळखावं
कल्पनेवरून कसं ठरवावं?
राधा अशी, राधा तशी
राधा मला कळणार कशी...
तिला गवसायला, तिला उमगायला
मनातलं सारं तिच्या समजायला -
कॄष्ण भेटायला लागतो ......
रुक्मिणी आधी हक्क मिळणं
मीरेची भक्ती नाही, कॄष्णेची विरक्ती नाही
तरी तिच्या तुळेत कुणीच नाही...
किती छान असेल ना राधा असणं
फक्त प्रेम धुंदीत जगणं!
वाट बघण्याचा तोष नाही, असूयेचा दोष नाही
.....अढळपदाची स्पर्धाच नाही
किती छान असेल ना राधा असणं
घुंगर बांधून बेफ़ाम नाचणं
पावरीचा शोध नाही, सुरांत कधी प्रदोष नाही
....रासलीलेला अंतच नाही
खरच छान असेल का राधा असणं ?
जपात नाव पहिले उठणं?
इतकं सुंदर, इतकं पूर्ण....
सर्वांपासून वेगळच जगणं
कुणास ठाऊक, कसं ओळखावं
कल्पनेवरून कसं ठरवावं?
राधा अशी, राधा तशी
राधा मला कळणार कशी...
तिला गवसायला, तिला उमगायला
मनातलं सारं तिच्या समजायला -
कॄष्ण भेटायला लागतो ......