Sunday, 30 September 2018

मृदु चंद्र असला जरी सांज वेळी
कुणासाठी आसूसते सूर्यफूल
प्रखर त्याची किरणे, दिनाचाच वाली,
परी उमलते फक्त त्याच्याच ठायी ?

निसर्गाचे चक्र कधी न चुकवता
कशी नियती स्वीकारते सूर्यफूल
सावली नकोशी, कोमेजते पावसात
जो दाह देतो, हासते त्याच पायी?

कपाळी असे का पूजिले हे समर्पण
कसा जन्म घेवून उगवते सूर्यफूल
दिवसा कसे ताठ मानेने फिरते, मग
 जाताच तो , का पडते उन्मळून?

सामान्य मनाला कसे रे सुचावे
कसा धर्म सांभाळते सूर्यफूल !
अस्तित्व साध्या फूलाचे जपाया
न चुकता उगवतो, जगी ऊब देतो- त्या एका फूलाचा तो एक नारायण  !

No comments:

Post a Comment