रागे रागे रुसली , उगा हिरमुसली
हास ना - थोडीशी
खोटी खोटी खिजली ,कोपऱ्यात बसली
बोल ना -थोडीशी
मोडी मोडी चालली, वाट चुकवली
वळ ना -थोडीशी
जाणे जाणे भुलली ,भली विसरली
भेट ना - थोडीशी
मुसु मुसु रडली ,माझ्यावर चिडली
माफी ? -थोडीशी
गाली गाली हसली, आता कशी फसली
लाज ना - थोडीशी
कळी कळी खुलली -बघ विरघळली
बिलग ना - थोडीशी….
No comments:
Post a Comment