दुडक्या पावलान बरोबर धावताना इतकी रमून गेले
बाहुला-बाहुलीच्या लग्नात मी हि लहान झाले
ह्या परीला वाढवताना अशी मग्न होवून गेले
कि एके दिवशी "ही मोठी कधी झाली" म्हणून स्वतःच थक्क झाले !
'मोठं' होतानाचे तिचे प्रश्न, मला दुविधेत टाकायला लागले...
तिचा निरागसपणा कसा जोपासू-संभ्रमात पडायला लागले..
“आयुष्याची सारी सत्य तिला समजवायला हवीच-
मात्र तिच्या स्वछंदी जगण्यावर पाबंदी नको कधीच”.
केव्हा तरी दोघींचे द्रीष्टीकोन विरुद्ध व्हायचे..
माझा सय्यम,तिचा आत्मविश्वास एकमेकांना टक्कर देवू पाहिचे..
अश्या वेळी मग दोघी मिळून त्यातून मार्ग नक्की ठरवायचो,
दोन अन दोन पाच होतील असा हिशोब शोधून काढायचो !
हा तोल सांभाळताना आम्ही कधीतरी मैत्रिणी बनून गेलो….
जिवाभावाच्या गप्पांच्या,गुपितांच्या, सवंगडी होवून गेलो.
तिच्या माझ्या रस्त्यांच्या दिशा येवून मिळाल्या...
कारण पिढी जरी बदलली तरी भूमिका त्याच राहिल्या !
जीवनातल्या ह्या वळणावर आज मी स्वतःला समाधानी बघते..
माझी छोटीसी ‘राजकन्या’ आता ‘राजराणी’ होवून मिरवते...
माझ्या संस्कारांचा परिचय आपल्या वागणुकीतून देते
तिची आई असल्याचा अभिमान वारंवार घडवून आणते.
ही नदी अशीच पुढे वाहत राहणार नाही का !
आता लवकरच मी आजी होणार आहे - आणि हळूच एक गम्मत सांगू का ?
माझी लेकही 'बाहुलीच' मागतेय.....
आमचं नातं जणू पुढच्या पिढीला वारसा देवू बघतेय !