Thursday, 22 September 2016
ह्यालाच म्हणतात का ग - 'Valentine' ?
आठवतायेत ते दिवस ? नुकतेच आपण भेटलो होतो…. अस्पष्टच थोडसं पण गालातल्या गालात हसत होतो … नजरेनच एकमेकांच्या मनातलं सारं ओळखत होतो समोरासमोर आलो नुसते तरी मनोमन मोहरत होतो !
सारं कुठे गुलाबी होतं ?! काट्यातूनही चाललो आपण आठवतं का -बिछान्यात, पाठ फिरवून रात्रभर केलेलं जाग्रण ? पण तो रुसवा , तो फुगव, क्षण भराचा होता मनवण्याचा सोहळा त्यानंतर किती रात्र चालला !
श्वासात भिनलेली तू - सोडून गेलीस हे पटलंच नाही… मात्र आयुष्य परिपूर्ण आपलं म्हणून दुखः त्याचं मी केलंच नाही … आज पुनर्भेटीच्या वेळी , पुन्हा तुझा होवून येईन - अन मोक्ष स्वीकारण्यासाठी देवापुढे सज्ज उभा राहीन !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment