ती येणार त्या आधीच मी देवाकडे रोज प्रार्थना करायचे
माझ्या पोटी मुलगीच दे - हट्ट धरून बसायचे
लहानपणा पासून मला बाहुल्यांची खूप आवड...
आता खरीच बाहुली मिळावी म्हणून ही सारी धडपड !
मनात खूप बेत आखायचे... तिला असं नटवीन,तिला तसं घडवीन
माझ्या छोट्याश्या संसाराची तिला राजकन्या बनवीन
तिचा प्रत्येक बालहट्ट आवर्जून पूर्ण करीन
प्राजक्ताच्या फुलासारखा तिला तळहातावर जपीन.
आणि खरच माझ्या घरी एक 'जापानी' गुडिया आली
येवून माझी दुनिया जादूमय करून गेली....
ती खरे-खुरे डोळे लुकलुकुते - खर खुरं 'आ' करते
आणि सारखं माझ्याकडे बघून गोड गोड हसते
तिला नाहू माखू घालताना मला वेळच पुरत नाही
तिचं गोंडस रूप न्याहाळताना मला भानच रहात नाही
तिच्या बाल-लीलांमध्ये मी दिवस रात्र रमते
तिच्या उज्वल उद्याची सुंदर चित्र काढत बसते
डोळ्यात तेल घालून ह्या बाळाला जोपासायच आहे
हळुवारपणे ह्या वेलीला बहरू द्यायचं आहे
सौख्याच्या वर्षावात तिला समाधान शिकवायचं आहे
मानिनी-तेजस्विनी-गार्गी- असं घडवायचंही आहे
जगात नेहमीच होत असलं तरी मला हे सारं जमेल न
मातृत्वाचं लेणं हे -सार्थकी मी लावेन न
आईपणाच कर्तव्य नेटान पार पाडेन न
अजरामर ह्या नात्याचा मान मान ठेवू शकेन न !
कधी अनाहूत कुठल्या भितीन जरा घाबरते ही आई
तिच्या लेकराच भवितव्य सोनेरी होईल की नाही
म्हणूनच देवा hya aaichi hi साद ऐकून घे रे एवढी
आपल्या बाळाचं भाग्य स्वतः लिहायची तिला सूट दे रे तेवढी !
No comments:
Post a Comment