What is truth??
सत्य तुला जे पटेल ते
असेल जरी वा नसेल ते
तुझेच सदा असेल हे
दुसऱ्याचे कधीच नसेल ते
कधी इवलेसे पुरेल ते
कधी पुरून उरेल ते
अमृत कधी बनेल ते
कधी कंठ निळा करेल ते
कधी विश्राम सुचवेल ते
कधी प्रारंभ ठरेल ते
वाटेल कधी तुझ फोल हे
कधी संपूर्ण ॐ ते
कधी आपोआप उलगडेल ते
कधी लोपेल अशक्य ते
पाणावेल कधी हसताना हे
कधी भयाण म्हणून रडवेल ते
कधी भीष्मांच्या शपथेत ते
कधी नरो-वा-कुंजरोवात ते
तारेचे कधी अभाग्य हे
कधी घडवेल राम ते
पण असेल सत्य का खरंच खरे
- कारण दुज्याचे झूठ ते!
सत्याचे सत्य का कुणी पाहिले ?
की मित्थ्याच परमोच्च सत्य ते?