पहाटेच्या थंड वार्यात
नाजूक, हळवी, अलगद विसावलेली
माझी वाट बघणारी तूरात्रभर तुझ्या गंधात
मोहून,मुग्ध होवून हरवलेला
तुझ्यासाठी आसूसलेला मी...
तुझ्या गोर्या गर्वात मिसळलेले
लाजेचे शेंदूर
माझ्या मधाळ मनात माजलेले
मिलनाचे काहूर
तुला आवडतो उजेडा आधीचा अंधार
कोवळ्या समयीच तू फुलणार
नाहीतर स्पर्शाच्या उबेतही
लगेच कोमेजणार
सगळं तुझ्या मनासारखं
तुला हवं तेव्हा, तसच होणार
पण मी सुद्धा शिकलोय,
हलकेच साद घातली त्या achook वेळी
की तू पावसासम बरसणार.....
मला कळलीये ती वेळ
त्या वेळी तू आतूर, टपोर, करकरीत
त्याच वेळी मी तुला ओंजळीत भरून घेतो
प्राजक्ताच्या फुला, त्याच वेळी,
त्याच वेळी, मी तुला हलकेच टिपून घेतो...
No comments:
Post a Comment