Friday, 11 June 2021

Sare apan warkari

 मास भरे वर्ष सरे

चित्र तुझे धुसरले

जे जे तुझे ते ते सारे
दुज्या घरी शोभिले
जीव माझा झरे पडे
नाव तुझे जपू कसे
ना तू दिसे, ना तू असे
वास ही ग उडाला...
काय करू , कशी हसू
खोल दरी कशी सरू
तूच सांग काय खरे -
ठाव तुला नवे-जुने
........
नको रडू,नको जिरू
उगी नको शोक करू
असणे तू नको माझे
स्पर्शात शोधू फिरू
मृत्यू वा जन्म जसे
नाण्याचे बाजू दोन
काटा वा छापा कधी
स्रोत ना ही अंत कोण
चंद्राची कोर जिथे
दुज्या बाजू पौर्णिमा
दिन अन् सांज खोटी
खेळ त्याने मांडिला !
एक सत्य एक ज्ञान
बघ चोख अंतरी
माया हे जगन-मरन
सारे आपण वारकरी....

No comments:

Post a Comment