छोट्या छोट्या आठवणीत हरवलेले क्षण
तिथेच कुठे अडकलेले हळवे नाजूक मन...
तिथेच कुठे अडकलेले हळवे नाजूक मन...
कोवळ्या कोवळ्या किरणांमधून डोकावणारे कण
निष्फळ त्यांना बांधण्याचे पोकळ ते जतन !
निष्फळ त्यांना बांधण्याचे पोकळ ते जतन !
झुळझुळणाऱ्या नदीच्या सोबत असतो काठ
पण पाणी पुढे व्हायले तरी राहतोच ना तो ताठ...
पण पाणी पुढे व्हायले तरी राहतोच ना तो ताठ...
गंध चोरून वारा वाहतो - घे ना भरून श्वास
फुलाला त्या खुडण्याचा का तो वेडा ध्यास !
फुलाला त्या खुडण्याचा का तो वेडा ध्यास !
लुकलुकणाऱ्या चांदण्यांशी साध जरा हितगूज
उगाच त्यांना मोजताना निजून जाशील तूच !
उगाच त्यांना मोजताना निजून जाशील तूच !
लपाछपीचा चंद्राशी खेळ ना एकदा डाव
मोट्ठ्या सारखं वागण्याचा निखळू दे ना आव...
मोट्ठ्या सारखं वागण्याचा निखळू दे ना आव...
हुळहुळणाऱ्या जखमांशी ठेवतोस का रे नातं
दुःखच मिळतं जिथून ती धरावीच का वाट ?
दुःखच मिळतं जिथून ती धरावीच का वाट ?
चल गड्यारे , आला पाऊस, भीजून घेना चिंब...
कुणास ठाऊक कधी सुटावा मनकवडा संग !
कुणास ठाऊक कधी सुटावा मनकवडा संग !
No comments:
Post a Comment