Saturday, 26 August 2023

what is truth

 What is truth??


सत्य तुला जे पटेल ते
असेल जरी वा नसेल ते
तुझेच सदा असेल हे
दुसऱ्याचे कधीच नसेल ते

कधी इवलेसे पुरेल ते
कधी पुरून उरेल ते
अमृत कधी बनेल ते
कधी कंठ निळा करेल ते

कधी विश्राम सुचवेल ते
कधी प्रारंभ ठरेल ते
वाटेल कधी तुझ फोल हे
कधी संपूर्ण ॐ ते

कधी आपोआप उलगडेल ते
कधी लोपेल अशक्य ते
पाणावेल कधी हसताना हे
कधी भयाण म्हणून रडवेल ते

कधी भीष्मांच्या शपथेत ते
कधी नरो-वा-कुंजरोवात ते
तारेचे कधी अभाग्य हे
कधी घडवेल राम ते

पण असेल सत्य का खरंच खरे
- कारण दुज्याचे झूठ ते!
सत्याचे सत्य का कुणी पाहिले ?
की मित्थ्याच परमोच्च सत्य ते?

मैं बस तेरी बन्सी रे

 तू ही ग्वाला , तू ही मोहन 

तूही श्याम गिरधारी रे 

जो मैं राधा या हूं मीरा 

मैं तेरी दिवानी रे 


तुझं बिन सुनी मोरी रतियां 

जुग जुग तोरी प्यासी रे 

हर आहट पर बाट निहारूं

मैं तो तेरी दासी रे


ठुमक ठुमक कर वृन्दावन में 

मैं नाचू भ्रमराई रे 

तू निर्मोही ,तू है जोगी 

मैं बस तेरी बन्सी रे 

Prajakt

 पहाटेच्या थंड वार्यात

नाजूक, हळवी, अलगद विसावलेली

माझी वाट बघणारी तू

रात्रभर तुझ्या गंधात
मोहून,मुग्ध होवून हरवलेला
तुझ्यासाठी आसूसलेला मी...

तुझ्या गोर्या गर्वात मिसळलेले
लाजेचे शेंदूर
माझ्या मधाळ मनात माजलेले
मिलनाचे काहूर

तुला आवडतो उजेडा आधीचा अंधार
कोवळ्या समयीच तू फुलणार
नाहीतर स्पर्शाच्या उबेतही
लगेच कोमेजणार

सगळं तुझ्या मनासारखं
तुला हवं तेव्हा, तसच होणार
पण मी सुद्धा शिकलोय,
हलकेच साद घातली त्या achook वेळी
की तू पावसासम बरसणार.....

मला कळलीये ती वेळ
त्या वेळी तू आतूर, टपोर, करकरीत
त्याच वेळी मी तुला ओंजळीत भरून घेतो
प्राजक्ताच्या फुला, त्याच वेळी,
त्याच वेळी, मी तुला हलकेच टिपून घेतो...

Friday, 11 June 2021

For NRIs

 अधीर समय तू धर धीर

हा काळ कठीण तू हो खंबीर
माय लांब, भूमीही लांब
उसळते मनात चिंतेची लाट
काळीज तिथे अन् श्वास इथे
साधावा कसा तू हा समतोल
सात समुद्राचे हे अंतर ,
व्याकूळ करते खोल - खोल
परदेशी आलो, का आलो?
हा प्रश्न मनाला सलतो ना
पण स्वप्न तुझे एकट्याचे नव्हते
ध्यास सर्वांचा होता हा !
मातीत नव्या रूजणे ना सोपे
संस्कार तरी जपलेस तू
जुन्या नव्याचे धागे विणूनी
सामराज्य उभारले तुझेच तू
सौख्याच्या मागचे कष्ट तुझे पण
समजेल कधी रे केव्हा कोण
परम सत्य हे जग बघ विसरे-
घुसळल्या परी,मिळते ना लोण !
भेटशील पुन्हा, बिलगशील पुन्हा
खंत नकोरे करूस तू
समय कठीण हा असेल जरीही
झुंज देणारा कणखर तू !
सावर चल मग, घे तू उभारी
नको ढासळू पळभर तू
घे राम नाम, तो करेल छान
नको जरा डगमगूस तू !

For Radhika - leaving for Uni

 दिस सरताना उमगत नाही

काळ निसटत जातो आहे
अंकुर माझे लहान चिमुकले
नकळत उमलत बहरत आहे
रात- रात्र जागवतो जेव्हा
"बाळा नीजरे" म्हणते आई-
कुशीत आता येशील केव्हा
ओठावर थिजली अंगाई...
घास चिमुकले भरवीत असता
घर भर मागे पळता पळता
"हरले, दमले, खा ना स्वतःने "
का मी म्हंटले, स्मरते आता
आंघोळ, दूध अन दुपटे वाळे
झबले, कुंच्या, टीट काळे -
कधी मी ह्यातून बाहेर पडले
काल न कडेवर घेऊन फिरले !
गडबड घाई तुझी सदैव
माझे 'मी'पण तुलाच अर्पण
आज मोकळी झाले मग का
पुन्हा हवेसे वाटे बंधन
बघ माया ही कशी बिलंदर
पंख पिल्लाचे करते कणखर
झुरते, रडते व्याकूळ होते
पण, "घे तू भरारी", हासत म्हणते
उड आकाशी, उंच फिर तू
पड, झड, पण हरू नको तू
हो मोठा हो ताकतवर तू
आनंदाने जग स्वैर तू
पण कधी लागला तुला विसावा
आले जर का कधी रडाया
असेलच आई उंबरठ्यावर
मीठ-मोहरीने द्रिष्ट काढाया !

Sare apan warkari

 मास भरे वर्ष सरे

चित्र तुझे धुसरले

जे जे तुझे ते ते सारे
दुज्या घरी शोभिले
जीव माझा झरे पडे
नाव तुझे जपू कसे
ना तू दिसे, ना तू असे
वास ही ग उडाला...
काय करू , कशी हसू
खोल दरी कशी सरू
तूच सांग काय खरे -
ठाव तुला नवे-जुने
........
नको रडू,नको जिरू
उगी नको शोक करू
असणे तू नको माझे
स्पर्शात शोधू फिरू
मृत्यू वा जन्म जसे
नाण्याचे बाजू दोन
काटा वा छापा कधी
स्रोत ना ही अंत कोण
चंद्राची कोर जिथे
दुज्या बाजू पौर्णिमा
दिन अन् सांज खोटी
खेळ त्याने मांडिला !
एक सत्य एक ज्ञान
बघ चोख अंतरी
माया हे जगन-मरन
सारे आपण वारकरी....

Baba - 80th birthday - Radio broadcast

 सुखी माणसाचा हा सदरा

घालून बाबा जगतो
जाईल जिकडे तिथे अनंत
आनंद आणवतो
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥
नको हरू तू नको बसू तू
आठव बाबा देतो
सामर्थ्याचा मोळविक्या हा
दैवाला पण भिडतो
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥
वाघासम बघ बळ असावे
बाबा हे दाखवतो
नैराश्यावर मात करावी
आशा तो बाळगतो
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥
कुणी असेना कुणी नसेना
स्वतःमध्ये हा रमतो
सांज सकाळी उत्सव त्याच्या
भवती पिंगा धरतो !
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥
मित्राचा हा मित्र खरा हा
जीव जीवाला देतो
तिसऱ्याला पण हासत आपल्या
घरात जागा देतो
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥
साईंचा हा भक्त खरा जो
नमन तयांना करतो
नाही मागत पै पैसा हा
जप मुल्लांना म्हणतो
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥
जगण्याचा हा मंत्र आम्हाला
बाबा नेहमी देतो
हसत रहा रे फुलत रहा रे
आसू शत्रू ठरतो
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥
नसेल मोठा नसेल रुतबा
बाबा माझा साधा
पण माझ्या आणि ताईच्या तो
माहेराचा राजा
सुखी माणसाचा हा सदरा
घालून बाबा जगतो
जाईल जिकडे तिथे अनंत
आनंद आणवतो
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥

Farewell dear Altaf

 आकाशात का उगा हा

चंद्र एकटा पडला
त्याच्याच खळ्यात हळू मग
तॊ नकळत विरघळत गेला
ना तारका भावल्या त्याला
रवी किरणात होरपळून गेला
गडद निळ्या आसमंती
रंग स्वतःचा हरवून बसला
दोष कुणाला द्यावा ?
का दैवाचा खेळ असावा ?
ढग सारून समोर न येता
तो गुदमरत गुरफटत गेला
पृथ्वी वरचा मी मानव
हा खेळ पाहून गहिवरलो
ओवाळून बंधनात तयाला
मी बांधाया परी धडपडलो
ते प्रेम अपुरे पडले
तो एकलाच चालत गेला
अवसेचे निमीत्त साधून
अनंतात हरवून गेला ....
Farewell dear Altaf.

Tuesday, 6 October 2020

General musings

 मुद्दतों बाद साज़िशें कामयाब हुईं हैं 

 नायाब मोहब्बत - अब जाकर क़ुबूल हुई हैं


तुझ्यात दिसावा शाम सख्यारे मी म्हणून राधा झाले 

 अग्नी साक्षी राम मिळावा, मैथिलेतून सीता झाले  

अग राम, शाम हे कथेत असतात जग माझ्यावरच उलटून हसले.... 

 मग वस्त्र हरण का द्रौपदीचे ना कादंबरीतच दडून बसले !  


Wednesday, 18 March 2020

On Ramesh Kaka passing away...

छिद्र छिद्र आकाश होतय
पाश तुटत जाती...
कणखर मी उभी परी
माती सरत जाती...
पळ पळ हे दिवस कसे
पुढे पुढे जाती
इथेच होते आता कसे
दिसे नासे होती....
कण कण ह्या मूठीतून
वाळू सुटत जाती...
गुंफलेले बंध माझे
गाठ सोडत जाती...
मन मनात रूजलेले
धुसर धुसर होती
अन्
त्यांच्या मी जागी आता
आठव करून देती...

Thursday, 12 March 2020

On Dementia

Demetia has been the subject of my study for the last year. Is this how it feels ?
Aren't we merely memories ?
Little tales, small snippets, some stories …
How would life be without connections
A blank canvas, no past, no recollections ?
A shackle free present, no idea of the past
No pain nor happiness – nothing to last
No pride to cherish, No wounds to nurse,
How would life be without them - better or worse?
Just living in the moment – how easy could it be?
Stranger or friend –not knowing who you see…
Not knowing who loves you or what gives you joy…
Not needing to forgive whoever made you cry….
No smells that can bring forth a childhood scene
Tiny treasures in boxes – but what do they mean?
No places to revisit, no paths oft trodden
Bonds deeply buried….quietly forgotten….
Pray give me the troubles, the sorrows of knowing
The perils of remembering, the broken heart crying
I am willing to carry the burden of truth
But let me have my identity, when I rest for good…

Sakha...ani Sakhi

सखा - ही ओळखच किती गोड आहे
नुसत्या नावामध्ये सुद्धा एक अनामिकशी ओढ आहे
न बोलताच कळण्याची ,अबोलशी जाण आहे
हलकंसं हसला जरी - संवाद परिपुर्ण आहे !
मनातलं सारं उमगावं , त्याच्या डोळ्यातच तो ठाव आहे
स्वप्नामध्ये वसलेलं असं दोघांचंच एक गाव आहे
साऱ्या नात्यांहून सोवळा - त्याचा आगळाच एक मान आहे
न मागता दिलेला निरागस अधिकार आहे
तो नसला जरी भवती तरी सुंदरसा भास आहे
मनामध्ये रुजलेला श्रीरंग तोच आहे
ओळखीच्या गर्दीत तो एकटाच उभा छान आहे
मन मोकळं वागावं - मी त्याच्या सवे लहान आहे !
अंग अंग भिजले तरी उरलेली तहान आहे
पूर्णत्व नकोचरे.....हा प्रवासच फार गोड आहे


मी :
सहज ओळख करून देताना म्हणालास ,
"ही माझी मैत्रीण"
निनादला तो शब्द कानात -
पण त्याचा अर्थ समजावून सांगशील ?
तो :
मैत्रीण - ही ओळखच किती गोड आहे
नुसत्या नावामध्ये सुद्धा एक अनामिकशी ओढ आहे
न बोलताच कळण्याची ,अबोलशी जाण आहे
हलकंसं हसली जरी - संवाद परिपुर्ण आहे !
मनातलं सारं उमगावं , तिच्या डोळ्यातच तो ठाव आहे
स्वप्नामध्ये वसलेलं असं दोघांचंच एक गाव आहे
साऱ्या नात्यांहून सोवळा - तिचा आगळाच एक मान आहे
न मागता दिलेला निरागस अधिकार आहे
ती नसली जरी भवती तरी सुंदरसा भास आहे
मनामध्ये रुजलेली कृष्णेचीच आस आहे
ओळखीच्या गर्दीत ती एकटीच उभी छान आहे
मन मोकळं वागावं - मी तिच्या सवे लहान आहे !
अंग अंग भिजले तरी उरलेली तहान आहे
पूर्णत्व नकोच,तिची त्यातच खरी बात आहे.....

Radhika's poems

Gone, gone with the wind as they say
With them goes another piece, 
a piece of the puzzle that completes my memories
I search; restlessly at first for those smiles, 
for those words of praise that will no longer come my way
Never before have the sands of time seemed to run so quick
As the strands woven into my tapestry slowly come undone, 
they leave me
With only the mirror as proof of the years passed by
To think that I am part of someone else’s puzzle, 
a piece that so far only some have found
With many more years and memories to make 
sometimes I wonder
Who will miss my piece when I go far away?
Will I be missed at all? Or will I simply be
Gone, gone with the wind as they say...


I live on.
I thought coming home would be for the best
Staying in bed all day and getting some rest
But now I am afraid of what sleep will bring -
Flashes of foes and friends with arms in a sling..
Will I ever forget the faces
of those asleep forever
No I won’t, never
As I close my eyes, the death rattle of guns begins
How long will it take
for the blood from the wounds to rinse
Sleep brings memories
as dark as the night sky
Sometimes I ask myself why did I make this choice, why?
My heart is crying
As to let slip from my mind
all those bitter memories....
I am trying
Yet as I wake, terror and sweat disfigure my face
All I know is that I’ve lost the race -
Remember , I was not meant to have lived -
Despite all the odds though I have survived….

Kuch hota gar beech hamare.....

कुछ होता गर बीच हमारे
तो शायद कुछ ऐसा होता
मिसाले मोहब्बत के पन्नों में
बस आपका और हमारा नाम होता
मिलकर ठहरी थी जो नजर कुछ पल....
दो लब्जों को कलम कर जाती
बेझिजक किसी खय्याम की
रूबाई को आजमा आती
वो रास्ता जो साथ चलें थे
इश्के-मंजिल के शहर जाता....
हमारी इबादत का सबूत देख
कोई शहनसाह भी नजर झुकाता
कम्बख्त जो गुजर चुका है
वो हसीन दौर लौट आता.....
किसी मधुशाला के पैमाने में
कसम है वो नशा होता !
कुछ होता गर बीच हमारे
तो शायद कुछ ऐसा होता ......

Kasoor

है तेरी मरजी या किस्मत की ख्वाईश
खुदके जनाजे में हम है
हो तुम जो रूठे तो धडकन भी ऐठें
साँसों का क्या है कुसूर...
मन मेरा तेरा था, खुशियों का आंगन था
मेहेका सा हर एक कोना ,
गमला गर फूटा, तो काँटों ने लूटा
भंवरे का क्या है कुसूर....
उजडा ये आलम है, हर पल जो खोया है
ढूंडे उसे कैसे हम
जो साथ छूटा तो हर ख्वाब टूटा
पलकों का क्या है कुसूर....

On Radhika turning 18

Radhika turned 18 yesterday and as if every single feeling and emotion of the past 18 years enveloped into that one moment when I felt - "the umbilical cord breaks finally"...
But does it ever ? Because at that very moment, I wanted to be with my aai- back into her folds, back to being her baby so I could get an assurance from her that my baby would be fine as she steps out on her own !
Strange is the mind but stranger are the ways it weaves relationships....
तिची दुनिया सोनसळी, स्वप्नपंखही चंदेरी
तिचा उल्हास मोहक , दृढ विश्वास सोबत
ह्या खुळ्या वयाची सावली, थोडी मलाही आठवली
माझं पिल्लू मोठं झालं, आणि, आईगं, मला तू लागली...
पुन्हा अल्हड मी व्हावं, नवं स्वप्न रोज पहावं
तुझ्या मिठीच्या मायेत पुन्हा सुखाने निजावं...
तेवढ्यात हाक तिची येता, खर्या जगात मी आली
झाले आई तिची, पणं , आईगं , मला तू लागली...
तुझा जीव माझ्यात रमला, माझा तिच्यात रुजला
तुझा उंबरठा ओलांडून तिला विसावा मी दिला
पिल्लू घरटे सोडून उडू पाहतय सकाळी
तिला निरोप देताना पण,आईगं, मला तू लागली...
जे जे तू पेरलंस,तिला दिलं ते मी सारं
सुख वेचत रहावं, दुःख शोधू नये फार
जपावी गं नाती, मनं सांभाळावी हळवी
तिला बळ देता देता, पण,आईगं, मला तू लागली...
तुम्हा दोघींचा मी दुआ, आठवणी नव्या जुन्या
तीन पिढ्यांचा सोहळा, पुन्हा नव्याने रंगला..
तुझ्या अंशाची ही ज्योत, बघ तेजोमय झाली
आई मला तू लागतेसच, पण सांगू,
तिलाही तू हवी !
Adding a note because a poet I really admire (you know who you are  asked me this morning - " what does लागली mean ?" I then realised, it probably is a word that is associated with my childhood and my family only - लागली means, desperately needed, like भूक लागली ! )))

Suryaphool

मृदु चंद्र असला जरी सांज वेळी
कुणासाठी आसूसते सूर्यफूल
प्रखर त्याची किरणे, दिनाचाच वाली,
परी उमलते फक्त त्याच्याच ठायी ?
निसर्गाचे चक्र कधी न चुकवता
कशी नियती स्वीकारते सूर्यफूल
सावली नकोशी, कोमेजते पावसात
जो दाह देतो, हासते त्याच पायी?
कपाळी असे का पूजिले हे समर्पण
कसा जन्म घेवून उगवते सूर्यफूल
दिवसा कसे ताठ मानेने फिरते, मग
जाताच तो , का पडते उन्मळून?
सामान्य मनाला कसे रे सुचावे
कसा धर्म सांभाळते सूर्यफूल !
अस्तित्व साध्या फूलाचे जपाया
न चुकता उगवतो, जगी ऊब देतो- 
त्या एका फूलाचा तो एक नारायण !

You promised...

You promised you would "call later"
the phone's not away from me
A day, a week, a fortnight,
Now a month - how long will it be ..
I promised I would be there
And you said you would come to me
A day, a week, a fortnight,
Now a month - how long will it be...
You promised we were sisters
in glory ,grief or glee- it'd be you and me
A day, a week, a fortnight,
Now a month - how long will it be....
I promised I would stay strong - never crumble
And if I did , you'd be right there beside me
A day, a week, a fortnight,
Now a month - how long will it be....
Go on, ask me like when you were naughty
"are you cross with me ?"
YES I AM , if you care to listen...
But hear this too from me -
A day, a week, a fortnight, now a month-
We will love you forever and ever...however long it be...

Radha - Meera

जो मीरा है अधूरी
तो राधा भी कहाँ पूरी
पर बसा दोनों के मन में है जो
वो ग्वाला पूर्ण सखी री...
जो मीरा ने विष पिया
तो राधा भी रही प्यासी
पर चाहा अम्रित दोनों ने जिससे
नाम उसका गिरधारी
जो मीरा भई बैरागी
तो राधा कहाँ बिहाई
पर रंगा दोनों को सिंदुरी जिसने
वो नील रंग निरमोही
बसा दोनों के तन मन में जो-
वो कान्हा है हरजाई
शाम नाम दोनों के मुख में-
होठों से उसने बंन्सी लगायी .....

Ijjajat

हमारी मोहब्बत पर उस रोज
आप थोडा-सा हक जताते
गुस्ताखियाँ हुई गर हमसे
इस तरह तो सजा ना देते
जाते जाते जाँ हमसे, इजाजत ही लेते जाते....
माना थी बेरंग तस्वीरें - कुछ लम्हे ही उनसे चुराते
काली थी गम की स्याही मगर, क्या इक नज्म ना कलम कर पाते
जाते जाते जाँ हमसे, इजाजत ही लेते जाते ....
होठों पे खिलती हँसी को
अपनी आँखों तक पहुँचने देते
चंद लकीरों के फैसलों पर
यूँ रुसवा ना आप होते
जाते जाते जाँ हमसे, इजाजत ही लेते जाते ....